आमची सेंद्रिय खतं उत्पादने
आमची नाविन्यपूर्ण खत उत्पादनांची श्रेणी पहा
आमच्या सेंद्रिय उत्पादनाविषयी
पिकांना संभाव्य उत्पन्नापर्यंत पोचण्यासाठी मातीत क्वचितच पुरेसे पोषक तत्त्व असतात. मातीत पोषक तत्त्वांचं प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी सेंद्रिय खतं किंवा रासायनिक खतांची आवश्यकता असते. अॅग्रोकेमिकल्सच्या वापरामुळे बऱ्याच प्रमाणात परिसंस्थेचं नुकसान होते त्याचप्रमाणे मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. याशिवाय, उच्च अॅसिडीक प्रमाण, अधिक सलाईन, आटोपशीर, वाळवंटीकरण, नित्कृष्ट तसेच वारंवार मशागत केल्याने
मातीची स्थिती झपाट्याने खालवते आहे. वेगाने वाढणारे शहरीकरण आणि जंगलतोड पर्यावरणावर सर्वाधिक प्रभाव टाकतात, ज्यामुळे हवामान बदल, मातीची धूप, पीक उत्पादनात घट, मोठ्या प्रमाणावर पूर येणे तसेच वातावरणात हरित वायू उत्सर्जन वाढते.
या सर्व घटकांमुळे सेंद्रिय खतांचा विकास आवश्यक असून त्यांचा वापर मातीच्या कंडिशनिंगसाठी केला जाऊ शकतो आणि सहज उपलब्ध व स्वस्त कच्च्या मालापासून उत्पादित होऊ शकतो.
आम्ही सेंद्रिय उत्पादनांचा शोध लावला, ही उत्पादनं पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करतात, पोषणासह उत्पादन वाढवतात, पिकांमधील धातूसदृश घटक (मेटलॉइड्स) आणि किटकनाशकांचे अवशेष मुक्त किंवा कमी करतात, त्याचप्रमाणे ती पर्यावरणपूरक आणि शेतकरी अनुकूल आहेत.
आम्ही नेहमीच अत्यंत काळजीपूर्वक उत्पादनांचा शोध घेतो व उत्पादन पर्यावरणपूरक, कार्यक्षम, स्थिर आणि शून्य अपव्यय असेल याची खात्री करतो.
आमच्याद्वारे संशोधित करण्यात आलेली उत्पादने ही अतिशय अभिनव पद्धतीची आहेत. कारण ती केवळ वनस्पतींना आवश्यक पोषकच पुरवत नाहीत तर जमिनीत ह्यूमस निर्मितीला प्रोत्साहन देऊन जमिनीची सुपीकता देखील वाढवतात. निरोगी मातीची उपलब्धता हा कोणत्याही अन्न व्यवस्थेचा मूलभूत पाया समजला जातो. निरोगी मातीत विघटित सेंद्रिय पदार्थ किंवा संयुगांचे प्रमाण असते. त्यात ह्यूमस तयार करण्यासाठी विघटन करण्याची प्रक्रिया सुरू असते. अशी निरोगी माती सुदृढ पिकं घेते. ज्यामुळे ग्राहकांच्या कल्याणासाठी पोषण मिळते.
आमची नाविन्यपूर्ण सेंद्रिय खतं
ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर :
ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीव्हेटर हे अशाप्रकारचे एकमेव उत्पादन असून आमचं नाविन्यपूर्ण सेंद्रिय उत्पादन
खासकरून आमच्या टीमने डिझाईन व तयार केलं आहे. इथनॉल डिस्टीलरीजचं धोकादायक धुलाई गाळ उपचारातील हा गेमचेंजर ठरेल. धोकादायक धुलाई गाळाचं रूपांतर अद्वितीय द्रावणात करून निसर्ग मातेला पर्यावरणीय धोक्यापासून मुक्त करण्याचं आमचे उद्दिष्ट आहे.
ग्रँडहार्वेस्ट बायो-ऑर्गेनिक लिक्विड फर्टीलायझर:
ग्रँडहार्वेस्ट बायो-ऑर्गनिक लिक्विड फर्टीलायजर चांगल्याप्रकारे संतुलित असून त्यात मॅक्रो तसेच मायक्रो न्यूट्रीयंट्स, खनिजं आणि रोपं व पिकांच्या वाढीकरीता आवश्यक अन्य घटकांचा समावेश असतो. हे खत पर्यावरण स्नेही, शेतकरी-स्नेही आणि बिनविषारी असून वनस्पतींकरिता सुरक्षित मानलं जाते.
ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर:
ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझरमध्ये पिकांसाठी संतुलित पोषक तत्त्वं असून त्यामुळे मातीची सुपीकता आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढीस चालना मिळते. हे मूळ खत रोपांना इष्टतम उत्पादकता प्राप्त करण्यासाठी पुरेशा पोषक तत्वांचा पुरवठा करते तसेच मातीच्या सुपीकतेचं पुनर्निर्माण करण्यास पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण सुनिश्चित करते.
ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर:
ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायजर हे किफायतशीर आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित वनौषधीजन्य उत्पादन बऱ्याच प्रकारच्या शोषण, जटीलता, फवारणी तसेच रासायनिक बदलाद्वारे मेटल आयन व कीडनाशक अवशेषांची उपलब्धतता यशस्वीरित्या कमी करते.
ग्रँडहार्वेस्ट अॅक्टीवेटर
जगात प्रथमच, सेंद्रिय उत्पादनाने डिस्टिलरी स्पेंट वॉशचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये केले आहे.
ग्रँडहार्वेस्ट फर्टीलायझर
रूप प्रथमच, सेंद्रिय उत्पादनाने डिस्टिलरी स्पेंट वॉशचेांतर सेंद्रिय खनाल केले आहे.
ग्रँडहार्वेस्ट ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर
ऑर्गेनिक रूट फर्टीलायझर मृदा सुपीकता
आणि मातीमधील सेंद्रिय घटक वाढवते.
ग्रँडहार्वेस्ट
न्यूट्रलायजर
पीक उत्पादनातील जड उपधातू आणि किटकनाशकांच्या अवशेषांचे विषारी परिणाम निष्क्रिय करण्यासाठी ग्रँडहार्वेस्ट न्यूट्रलायझरची मदत होते.
अभिमान वाटण्याजोगे
अभ्यागत काउंटर:
संपर्क साधण्याकरिता
ए-1808, कैलास बिझनेस पार्क,
एलबीएस मार्ग, पार्कसाईट,
विक्रोळी (पश्चिम)
मुंबई- 400079, भारत
कॉपीराइट © 2021 गजाली ग्रुप | कॉपीराइट राखीव | कोप्रोम्पट द्वारे संचालित